Download App

News Arena India Survey : आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरेंच्या जागा धोक्यात ! नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ?

  • Written By: Last Updated:

News Arena India Survey Ahmednagar : राज्यात आज विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक 125 जागा भाजपला मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 जागा मिळतील. शिंदे गट व ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे. शिंदे गटाला 25 जागा, तर ठाकरे गटाला 17 ते 19 जागा मिळतील. तर इतरांना बारा जागा मिळतील, असा अंदाज न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्व्हेत वर्तविल्या आहेत. त्यात जिल्हानिहाय सर्व्हे करून अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या दोन जागा वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे दोन जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेवरून दिसत आहेत. ( news-arena-india-survey-ahmednagar-ncp-bjp-how-many-seat-won)

नगर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा आमदार आहेत. तर भाजपचे तीन आमदार आहेत. एक अपक्ष आमदार आहे. तर दोन काँग्रेसचे आमदार आहेत. या सर्व्हेत भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या पाच जागा निवडूण येतील. काँग्रेसचे दोन्ही जागा निवडूण येतील, असा सर्व्हेचा अंदाज आहे. भाजपच्या दोन जागा वाढतील, तर राष्ट्रवादीच्या दोन जागा घटतील, असा अंदाज आहे. या अंदाजानुसार राहुरीची जागा भाजप जिंकेल, असा सर्व्हे आहे. या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत.

2 सर्वेंमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

कोपरगावची जागाही भाजप जिंकेल, असे सर्व्हेत म्हटले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे आमदार आहेत. येथून आशुतोष काळे हे थोड्या मताने विजयी झाले आहेत. इतर जागांवर मात्र कुठलाही बदल सर्व्हेत दाखविण्यात आलेला नाही. नगर शहर, अकोले, जामखेड-कर्जत, पारनेर, नेवासा या जागा राष्ट्रवादी पक्ष जिंकेल, असे सर्व्हेचा अंदाज आहे. नेवाशामध्ये शंकरराव गडाख हे अपक्ष आमदार आहेत. गडाखांना राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. ही जागा आता राष्ट्रवादीला सर्व्हेत दाखविण्यात आली आहे.

धनंजय मुंडेंच्या पाठिंब्याने पंकजा मुंडेंची नवी राजकीय इनिंग : 6 महिन्यात दुसरी निवडणूक एकत्र

श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव-पाथर्डी येथील जागाही भाजप जिंकेल, असे सर्व्हेत म्हटले आहेत. या तिन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या तीन, कोपरगाव व राहुरीच्या दोन जागा अशा पाच जागा भाजप जिंकू शकते. काँग्रेसकडे सध्या श्रीरामपूर व संगमनेर अशा दोन जागा आहेत. दोन्ही जागा काँग्रेस पुन्हा जिंकेल अंदाज आहे. त्यामुळे कोपरगाव, राहुरी मतदारसंघ वगळता सध्याच्या आमदारांना कुठलाही धोका नाही, असे या सर्व्हेतून दिसून येत आहे.

Tags

follow us