Download App

Dhangar Reservation : चौंडीत आंतरवलीची पुनरावृत्ती; धनगर आंदोलकाची प्रकृती खालवताच लावले सलाईन

  • Written By: Last Updated:

Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे यशवंत सेनेचं (Yashwant Sena) उपोषण सुरू आहे. आज या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवार यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर आज दुसरे उपोषणकर्ते सुरेश बंडगर (Suresh Bandagar) यांचीही प्रकृती खालावली असून सध्या त्यांच्यावर सलाईनने उपचार सुरू आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात मोठं आंदोलन झालं. त्यावेळी त्यावेळी सरकारने नमतं घेत कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. त्यानंतर आता धनगर समाज आक्रमक झाला झाला. माजी मंत्री बाळासाहेब दोडातळे यांच्या नेतृत्वाखाली चोंडीत उपोषण सुरू आहे. राज्यभरातील यशवंत सेनेचे पदाधिकारी चौंडीत जमले आहेत. गेल्या बारा दिवसांपासून येथं उपोषण सुरू आहे. आतापर्यंत दोघांची तब्येत खालावली आहे.

दरम्यान, काल (१६ सप्टेंबर) राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नगर आणि चौंडीला भेट देऊन येत्या दोन दिवसांत राज्य सरकार याबाबत ठोस निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.

उपोषणापासून मागे हटणार नाही
काल गिरीश महाजन उपोषणस्थळी होते. त्यांनी दोन दिवसांत निर्णय घेणयात येईल असं आश्वासन दिलं. मात्र, जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. गेली ९ वर्षापासून आम्ही हा प्रश्न भाजपकडे मंडतोय. २०१४ ला आरक्षण देऊ असं सांगितलं. मात्र, अद्याप आरक्षण मिळालं नाही. आाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राण गेला तरी चालेल, पण उपोषणापासून मागे हटणार नाही, असं सुरेश बंडगर यांनी सांगितलं.

Punit Balan यांच्या मनात नक्की काय? जाणून घ्या त्यांचा प्रवास Letsupp Business Maharajas मध्ये 

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, ही धनगर समाजाची मागणी अनेक वर्षे जुनी आहे. विविध राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळं धनगर समाजाने आता आक्रमक पावले उचलत राज्य सरकारकडे निषेध आंदोलन, रास्ता रोको, उपोषणे करून आरक्षणाची मागणी सुरू केली आहे.

आज यशवंत सेनेने चौडी येथे समाजाची बैठक बोलावली असून या बैठकीत आरक्षणाबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

Tags

follow us