Download App

CM शिंदे काश्मीरमधून देणार अण्णा हजारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनही होणार!

Maha Arogya Camp : ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (दि. १०) रोजी हजारो गरजू रुग्णांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Camp) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निळोबाराय विद्यालय (Nilobarai Vidyalaya) येथे या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (On the occasion of Anna Hazare’s birthday, a Mahaarogya camp was organized at Ralegansiddhi)

मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि राळेगणसिद्धी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहेत.

धक्कादायक! लव्ह जिहादच्या संशयातून 15 जणांच्या टोळक्याची युवकाला मारहाण; गुन्हे दाखल, एकाला अटक

या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या शिबिरात हृदयविकार, अँजिओग्राफी, किडनी विकार, मुतखडा उपचार, कॅन्सर, कॅन्सर प्रतिबंधक लस, डोळे तपासणी, मोतीबंदू शस्त्रक्रिया, पोटाचे विकार, दंतरोग, एन्जोप्लास्टी अशा कुठल्याही आजाराचे उपचार केले जाणार आहेत. याशिवाय, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहेत.

शिबिरात दुर्धर आणि गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केले जाणार असून या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच या शिबिराविषयी माहिती परिसरातील लोकांनी द्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश मापारी, श्याम पठडे, सुरेश पठरे, दत्ता आवारी, वैद्यकीय मदत कक्ष राज्य विस्तारक जीतेंद्र सातव , नगर समन्वयक रणजित परदेशी आदी मेहनत घेत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे कश्मीरमधून देणार शुभेच्छा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सटकुटुंब काश्मीरमध्ये सुट्टीवर गेले आहेत. गुरूवारी (8 जून) 3 दिवसांच्या सुट्टीसाठी ते रवाना झाले. त्यांनी गुरूवारी माँ वैष्णवदेवीचे दर्शन घेतले. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस ते जम्मू-काश्मीरमध्ये असणार आहेत. या देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर ते काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा देखील करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता शिंदे काश्मीरमधून अण्णा हजारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसणार आहेत.

Tags

follow us