मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी… ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टोलेबाजी

अहमदनगर : देशात महागाई वाढत आहे. यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे काही घेणे नाही. जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना दुसरीकडे मात्र मोदी आपल्या फॅशनसाठी खर्च करातात. मोदी प्रत्येक वेळेला नवा ड्रेस घालून मिरवतात. मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी रुपये […]

Untitled Design (13)

Untitled Design (13)

अहमदनगर : देशात महागाई वाढत आहे. यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे काही घेणे नाही. जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना दुसरीकडे मात्र मोदी आपल्या फॅशनसाठी खर्च करातात. मोदी प्रत्येक वेळेला नवा ड्रेस घालून मिरवतात. मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी रुपये आहे, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे अहमदनगरला आले होते. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. वानखेडे यांनी महागाई, शेतकरी उत्पन्न, रोजगार या विविध मुद्द्यांवरून मोदींवर तुफान टोलेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी त्यांच्या फॅशन व स्टाइलमुळे देखील चर्चेत राहतात. याच मुद्द्यावरून माजी खासदार वानखेडे यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींकडे कपड्यांचा ढिगारा आहे. त्यांचे कपडे लिलाव होतात. त्यांच्या एका ड्रेसला लिलावात 10 कोटी किंमत मिळाली. तसेच हा ड्रेस देखील गुजरातच्या एका हिरे व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

एकीकडं जनविकासासाठी आमदारांकडे पैसा नाही, बाहेर श्रीलंका देश डबघाईला आला आहे. पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. जर मोदी आणि भाजप या देशात राहिले तर अशीच वेळ भारतावर देखील नक्कीच येईल. अशा शब्दात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर कडव्या शब्दात टीका केली आहे.

Arvind Sawant : दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा.., ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका

यावेळी विनोद घोसाळकर (उपनेते) , विजय कदम(उपनेते) , साईनाथ दुर्गे, उल्हास पाटील (माजी आमदार), शशिकांत गाडे( शिवसेना जिल्हाप्रमुख), रोहिणी शेंडगे(महापौर), आशा निंबाळकर, विक्रम राठोड, रवींद्र वाकळे, संदेश कार्ले, भगवान फुलसौंदर, रामदास भोसले , गिरीश जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version