Parner Taluka Trade Union Election Result Declared; Mahavikas Aghadi’s heavy defeat by BJP : पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. महाविकास आघाडीने भाजप विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत 18-0 असा विजय मिळवला होता. खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा मविआने दारून पराभव केला होता. याच पराभवाचा वचपा आता खा. सुजय विखेंनी काढला. आज पारनेर तालुका व्यापारी संघाच्या निवडणुकीचा (Parner Taluka Trade Union) निकाल जाहीर झाला असून भाजपने 15-0 असा निर्विवाद विजय मिळविला आहे.
पारनेर तालुका व्यापारी संघाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. तालुक्यात भाजपला एवढं मोठं यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पारनेर व्यापारी पक्षाच्या निवडणुका यापूर्वी कोणत्याही विरोधाशिवाय झाल्या होत्या. मात्र, यंदा प्रथमच दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, 6 ठार, एकाच कुटूंबातील पाच जणांवर काळाचा घाला
खुद्द आमदार निलेश लंके हे या निवडणुकीकडे लक्ष देत असल्याने या निवडणुकीतही महाविकास आघाडीला एकतर्फी यश मिळाल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात होता. मात्र, भाजपकडून महाविकास आघाडीला कडवे आव्हान देण्यात आले. या निवडणुकीसाठी डॉ.सुजय विखे, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे, झेपीचे माजी उपाध्यभ सुजित झावरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजप तालुकाध्यक्ष सुनील थोरात, माजी तालुकाध्यक्ष वसंत छेडे आदींचा व्युवरचना केली होती. तर महाविकास आघाडीचे आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे, बाजार समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तरटे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, शिवसेनेचे उ.प्र. जिल्हाध्यक्ष रामदास भोसले यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून भाजप प्रणीत लोकसेवा पॅनलचे विजयी उमेदवार –
बाजीराव रामचंद्र आलाभर 69
प्रमोद बबनराव कावरे 70
सुनील बाळू पवार 61
संग्राम बाळासाहेब पावडे 69
सतीश राजाराम पिंपरकर – 72
दत्तात्रय राजाराम कोरडे – 64
गंगाधर भानुदार रोहकले – 64
प्रसाद भरत शितोळे 63
वैयक्तिक मतदारसंघ-
शैलेश संपत औटी 124
रघुनाथ माधवराव खिलारी 139
महिला मतदारसंघ –
ज्योती संदीप ठुबे 216
रेखा संजय माटे 206
इतर मागासवर्गीय –
अण्णा बबन शिंदे 210
संदीप अंबादास भागवत 160
भटक्या विमुक्त जाती जमाती –
भाऊसाहेब महादू मेचे 200
अजित नामदेव सांगळे 169