Kolhapur मध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, इमारतीवरुन उडी मारताना एकाचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके दगडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Police raid gambling den in Kolhapur, one dies while jumping from building)

झालं असं की कोल्हापूर येथील राजेंद्र नगर परिसरात काहीजण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रविवारी रात्री 11 वाजता याठिकाणी धाड टाकली. कारवाई होईल या भीतीने साहिल आणि त्याचा मित्र दत्तात्रय देवकुळे यांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली. त्यामध्ये साहिल याचे डोके एका दगडावर आदळले त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याचा मित्र दत्तात्रय देवकुळे हा देखील गंभीर जखमी झाला.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

पोलिसांनी छापा टाकला तेथे ते जुगार खेळत होते. पोलीस कारवाई करतील आपण जुगार खेळत होतो हे समोर येईल. म्हणून या दोघांनी हे टोकाचे पाउल उचलले. ही घटना घडल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले. तेथे जमा झालेल्या लोकांनी पोलिसांवर देखील कारवाई करावी अशी मागणी केली. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version