अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास कामं तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे महसुलाचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात महसुल विभागाचा कारभार फक्त वाळूसाठीच कामाला आला. या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणूनच मिरावले, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे (Balasaheb Thorat) नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.
ईडीची मोठी कारवाई, राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या राज्यातील 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त
नगर शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात नुकतेच नव्या महसूल भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमानंतर मंत्री विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्यांचे राजकीय विरोधक समजले जाणारे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली आहे.
यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, आपण जिल्ह्यासाठी नवं असं एक महसूल भवन उभारत आहोत. तसेच थोरातांबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले, ठीक आहे त्यांना ते जमलं नसेल किंवा त्यांनी दुसरीकडे काही उभं केलं असेल. मात्र विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालय देखील थोरातांच्या काळात झालं नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात या कामाला सुरुवात झाली, असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील विकासकामे अपेक्षित अशी झाली नाही. तसेच गेल्या अडीच वर्षात मागील महाविकास आघाडीचे सरकार हे तर केवळ फेसबुकवरच होते. मुख्यमंत्री मंत्रालयात देखील येत नव्हते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. यामुळे गेल्या सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाल्याचं म्हणत मंत्री विखे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.