Download App

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री विखेंचं आश्वासन

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : मराठा आरक्षणावरून सरकार कात्रीत सापडलेले असतांनाच दुसरीकडे आता धनगर समाज (Dhangar) आरक्षणाच्या मागणीसह अन्य प्रश्नांबाबत झाला आहे. दरम्यान, धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.

जेव्हा पक्ष सांगेल, तेव्हा मी नागपूरला जाईल; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान 

गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसह अनेक मागणी करत आहे. दरम्यान, आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आज धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या शिष्टमंडळाने वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांना दिले.

यावेळी शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर करीत आश्वस्त केले.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या संचालिका पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी चौंडी येथे यशवंत सेनेचे धनगर आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन विविध राज्यकर्त्यांनी दिले आहे. मात्र, आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला होता. मात्र, मंत्री महाजन यांनी हस्तक्षेप केल्यानं उपोषण मागे घेतले. तरीही आम्ही आरक्षणासाठी आग्रही असू, असं आदोलकांना सांगितलं. त्यामुळं धनगर समाजाच्या प्रश्नासह सरकार अन्य प्रश्न कसं सोडवते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us