Download App

आधी मुलगा आता वडील भाजपमध्ये, शेळके कुटुंब फुटले; बाळासाहेब थोरातांना धक्का

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : नगरमध्ये भाजपमध्ये (BJP) जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व.दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक रावसाहेब शेळके (Raosaheb Shelke) पाटील यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यांनी रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

पोखर्डी (ता. नगर) येथे भाजपच्या पदाधिकारी संवाद कार्यक्रमात शेळके यांचा जाहीर प्रवेश झाला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, बबनराव पाचपुते आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपूर्वी रावसाहेब शेळके यांचा मुलगा अंकुश शेळके भाजपमध्ये आले होते. आता वडीलही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.एकेकाळी हे सर्वजण माजी आमदार शिवाजी कर्डिलेंविरुद्ध लढत होते. ते आता एकाच पक्षात आले आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशामुळं आता नगर तालुका विभागालेल्या पारनेर, राहुरी, श्रीगोंदा मतदारसंघात कर्डिलेंनी ताकद वाढविली आहे.

ओवैसींचे राहुल गांधींना चॅलेंज; ढाल म्हणून राऊतांची मैदानात उडी 

काँग्रेसमय घराणे म्हणून ओळख असलेल्या शेळके कुटुंबीय भाजपवासी झाल्याने तालुक्यात महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का बसला आहे.नुकतीच झालेली अहमदनगर तालुका बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द कर्डिले गट अशी लढत होती. त्यात अंकुश शेळके यांना मविआकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभाव झाला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांनी भापजमध्ये प्रवेश केला होता. तर आता रावसाहेब शेळकेंनीही भाजपची वाट धरली.दोन्ही पित्रा-पुत्र भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, शेळके कुटुंबीयांची नगर तालुक्यात चांगली पकड असून, याचा फायदा भाजपला होणार आहे.

प्रताप शेळकेंची कोंडी
रावसाहेब शेळके यांचे चुलत बंधू प्रतापराव शेळके यांची मात्र कोंडी झाली आहे. प्रताप शेळके हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. ते बाळासाहेब थोरात समर्थक आहेत. ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत. परंतु त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

आमदार लंके खिंडीत
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंकेंना नगर तालुक्यातील शेळके कुटुंब मदत करत होते. तेच भाजपमध्ये आले. तर खासदार सुजय विखे हे लंकेंना युतीत असून पाण्यात पाहत आहेत. त्यामुळे आता नगर तालुक्यात राजकारण वेगळ्या वळणाला गेले आहे. कर्डिले विखेंनी दक्षिणेत आणखी ताकद वाढविली आहे.

काही महिन्यांपूर्वी अंकुश रावसाहेब शेळकेंनी आणि आता रावसाहेब शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जिल्हा परिषद भाजपसाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बडा नेता भाजपता गेल्यानं मविआला मोठा फटका बसणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us