तांबेंसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]

Untitled Design (26)

Untitled Design (26)

अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तांब्याच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन मते मांडली. तर काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी आपण तांबे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते.

बाळासाहेब साळुंखे यांनी आज (बुधवारी) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर संघाचे उमेदवार तांबे यांच्यावर अन्याय झालेला असून या अन्यायाच्या संदर्भामध्ये मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

साळुंखे हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते. थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी साळुंखेंवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. साळुंखे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाचे नाना पटोले यांच्याकडे पाठवलेला आहे.

साळुंखे हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक होते.त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.आज त्यांनी अचानक दिलेल्या राजीनामामुळे नगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

Exit mobile version