नगरमध्ये मध्यरात्री प्रवाशांवर दरोडा, पळून गेलेले 3 दरोडेखोर अवघ्या दोन तासात जेरबंद

अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ […]

Untitled Design (2)

ahmednagar crime

अहमदनगर : बारामतीला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मजुरांना बेदम मारहाण करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) शहरातील कायनेटिक चौकात अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा करून रिक्षाने पळून जाणाऱ्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पकडले आहे.

स्वप्नील बाबुराव साळवे ( वय १९ वर्षे), नीरज रवी पटारे ( वय १९ वर्षे), रितेश सुरेश शेंडगे (सर्व रा. शाहुनगर, केडगाव अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी प्रीतम उर्फ ​​पेप्या सावंत (रा. मोहिनी नगर केडगाव, अहमदनगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे.

याबाबतची तपशीलवार माहिती अशी की, मंगळवारी (दि. २९) रात्री दीडच्या सुमारास पवन सुरेश पैठणे, किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे हे चौघे बारामतीला जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत थांबलेले होते. दरम्यान, पहाटे अडीच वाजता रिक्षातून (एमएच १२ बीडी ४६१३ ) तिथ सहा जण आले आणि आरोपी राहुल डावरे याने पवन सुरेश पैठणे यांच्या तोंडावर फाईट मारून गळ्यातील चैन, मोबाईल, दोन हजार रुपये रोख काढून नेले. आरोपी रितेश सुरेश शेंडगे व नीरज रवी पटारे यांनी गोविंद दादाराव गोफणे याला मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला. आरोपींनी चौघांना मारहाण केली आणि प्रीतम उर्फ ​​पेप्या सावंत (रा. मोहिनीनगर, केडगाव) याने कोयत्याने तुमचे हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी देऊन आरोपी रिक्षात बसून पळून गेले. पवन सुरेश पैठणे (रा. तपोवन गोंधन, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते’; शरद पवारांचा खुलासा 

आरोपी केडगाव परिसरात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच कोतवाली पोलीस आरोपीच्या शोधात निघाले. कोतवाली पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली. चोरीला गेलेल्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षआ व इतर असा ९३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अशोक सरोदे, पोकॉ. याकुब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरुडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, होमगार्ड पाटसकर, होमगार्ड मुर्तुजा सय्यद, होमगार्ड शिंदे यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version