Download App

सदाभाऊ खोत आक्रमक; ‘तीन दिवसांत आमच्या मागण्यांचा विचार करा, अन्यथा…’

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot on Long March : शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहे. यासाठी त्यांनी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा सुरु केली आहे. आज सदाभाऊ खोत यांनी आईचे दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरुवात केली. हरिनामाच्या भजनात दंग होत ही पदयात्रा सातारच्या दिशेने रवाना झाली.

काँग्रेस राष्ट्रवादीने काळे कायदे केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. सरकारने न्याय द्यावा. यासाठी वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करुन कराड येथून सातारकडे रवाना झाली. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार तीन दिवसांत केला नाही तर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसह मुंबईला धडक देईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

Breaking! 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर…

ऊसाला चार हजार रुपये भाव देणारा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावा, दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटर हवाई अंतर असावे, अशी अट आहे. हे अंतर कमी करावे, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट बँकांनी काढून टाकावी, मूठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात आलेला तुकडेबंदी कायदा रद्द करावा, शेतमालावर आयात शुल्क तातडीने लागू करावे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता तातडीने द्यावा, या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने कराड ते सातारा अशी पदयात्रा काढण्यात आली.

Tags

follow us