समरजीतसिंह घाटगेंचे हसन मुश्रीफांना आव्हान, ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या!’

कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]

Untitled Design

Untitled Design

कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय.

समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ असा वाद पेटण्याची शक्तता आहे. समरजीतसिंह घाटगे म्हणाले, चाळीस कोटी रुपये सरसेनापती संताजी घोरपडेंच्या बॅकेत देखील डीपॉझिट झाले नाहीत. चाळीस कोटी रुपये कॅशमध्ये जमा झाले पण बॅक खात्यात जमा झाले नाहीत. हे चाळीस कोटी रुपये खाऊन बिळात का लपलात? असा सवाल समरजीतसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना केला आहे.

Ambadas Danve : इम्तियाज जलील यांची खासदारकी रद्द करा! दानवेंनी मागणी, नामांतराचा वाद पेटणार?

कागल तालुक्यातील सावर्डे खुर्दमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्धघाटन व कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात त्यांनी मुश्रीफांवर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून समरजीतसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या सभासदांचे चाळीस कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी लंपास केल्याचा आरोप घाटगे यांनी केला होता.

मुश्रीफांविरोधात 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करीत मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आपल्या विरोधात षडयंत्र असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Exit mobile version