Download App

मी अन् फडणवीस करेक्ट कार्यक्रम करणार; घाटगेंच्या विधानाने मुश्रीफांना धडकी

SamarjeetSingh Ghatage :  राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे भाजप सोडणार असलल्याचे बोलले जात होते. पण आता माझे राजकीय गुरु हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांणा पूर्णविराम दिला.

तसेच यावेळी त्यांनी आपण विधानसभा निवडणूक फक्त लढविणार नसून रेकॉर्ड फरकाने जिंकणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नुकतेच भाजपसोबत आलेले अजित पवार व त्यांचे सहकारी हसन मुश्रीफ यांची चिंता वाढणार आहे. अजित पवारांच्या शपथविधीला दोन दिवस पूर्ण होत असतानाच दुसरीकडे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद चव्हाट्यावर आला आहे.

दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार

घाटगे म्हणाले की, “मी आज येतानाच गुलाबी कुर्ता घालून आलोय. मी आज इथं घोषित करतो की, आपल्या विजयाचे भूमिपूजन आज झाले आहे. फक्त आमदारकी लढणार नसून आमदारकी रेकॉर्ड मार्जिनने जिंकणार. ज्या काही घडामोडी झाल्या आहे त्या करेक्ट झाल्या आहे. जे काय करेक्ट झाले आहे ते मी आणि फडणवीस साहेब पाहतो. मी माझी उमेदवारी घोषित करत नसून माझ्या विजयाची पायाभरणी घोषित केली आहे. ऑक्टोबर 2024 साली कागलचा कोंढाणा आपल्याला परत घ्यायचा आहे”.

CM शिंदेंचे नाराज आमदारांना 5 मेसेज; ‘वर्षा’वरील बैठकीत काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

दरम्यान, कोल्हापूरमधील कागल येथे हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्यातील वैर लपून नाही. मुश्रीफ मंत्री झाल्याने घाटगेंची कोंडी झाल्याचे बोलले जात होते. पण यावर घाटगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुद्रुकसाठी मी का पार्टी सोडायची असे म्हणत त्यांनी मुश्रीफांना टोला लगावला. तसेच एकप्रकारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे संकते त्यांनी दिले. यामुळे अजित पवारांसोबत आलेले हसन मुश्रीफ यांना खरोखरीच धडकी भरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Tags

follow us