Download App

पवारांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करणार अन् विधानसभा जिंकणार; समरजित घाटगेंना विश्वास

विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं.

  • Written By: Last Updated:

 

Samarjit Ghatge : गेल्या काही दिवसांपासून शाहू समुहाचे नेते समरजित घाटगेंनी (Samarjit Ghatge) हे शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. आज (23 ऑगस्ट) कागल येथे झालेल्या कार्यकर्त्यां मेळाव्यात त्यांनी आपला राजकीय निर्णय जाहीर केला. विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी कार्यकर्त्यांना केलं. 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकू, असा विश्वासही घाटगेंनी व्यक्त केला.

मोठी बातमी : संविधानाचा आदर राखून उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घ्या; शरद पवारांचे आवाहन 

यावेळी बोलतांना समरजित घाटगे म्हणाले, विरोधक मला एकटे पाडत नसून कागलच्या विकासाला ते एकटे पाडत आहेत. ते कागलच्या  भविष्याला एकटे पाडत आहेत. या मतदारासंघात मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवीणसिंह राजे, रणजितदादा पाटील आदी नेते उपस्थित होते.

SL Vs NZ 2024 : 5 दिवस नाही, श्रीलंका – न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना चालणार 6 दिवस, ‘हे’ आहे कारण 

समरजित घाडगे हा ब्रॅंड कार्यकर्त्यांनी तयार केला
पुढं बोलतांना ते म्हणाले, 2019 ला माझा निसटता परभाव झाला. त्यानंतर मी नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात कामे केलं. त्याची शरद पवार साहेबांना आणि जयंत पाटील यांना दखल घ्यावी लागली. समरजित घाडगे हा जो ब्रॅंड तयार झाला, तो या कार्यकर्त्यांनी तयार केला, असं घाटगे म्हणाले.

2019 मध्ये निवडणुकीला मी उभा राहिलो तेव्हा 35 हजार मतं मला पडतील अशी चर्चा होती. मात्र, मला 90 हजार मते मिळाली. मी निवडणूक जिंकत नाही, हे मला ठाऊक होतं. पण, 2019 ची निडवणुक लढली तरच आपण 2024 मधील निवडणूक जिंकू, असा विश्वास होता. चुकून तेव्हा 25 हजार मतं पडली असतील तर आज जयंत पाटील इथं नसते, अशी मिश्किल टिप्पणीही घाटगेंनी केली.

पुढे ते म्हणाले, मला निर्णय घ्यायचा असेल तर मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल हे मी जयंत पाटील यांना सांगितलं होतं. त्यांच्या आणि माझ्या भेटी झाल्या. त्या भेटीत तुम्ही लवकर निर्णय घ्या, कारण तुम्हाला आता मतदारसंघात जोमाने काम करावं लागेल, असं ते सांगायचे. आता मी शरद पवारांच्या नेतृत्वात प्रामाणिकपणे काम करेल, असं घाटगे म्हणाले.

follow us