Download App

Vishalgarth Encroachment वरून मुश्रीफ, सतेज पाटील, जलीलांवर संभाजीराजे आक्रमक

Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

Sambhajiraje Chatrapati Criticize Hasan Mushriff, Satej Patil, Imtias Jalil on Vishalgarth Encroachment : विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgarth Encroachment) हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेवर संभाजी राजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिली. त्यात त्यांनी हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? संभाजीराजेंचा सवाल

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, विशाळगड परिसरामध्ये कोंबड्या कापल्या जात असल्याने रक्त कोंबड्यांचे पंख पडलेले आहेत. ज्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून मद्यपान देखील या ठिकाणी केलं जात आहे. तसेच विशाळगडावर यासीन भटकळ हा सर्वात मोठा अतिरेकी आठ दिवस राहत होता. त्यावर आमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी पालकमंत्री सतेज पाटील हे देखील काही बोलत नाहीत. म्हणून मी हा लढा उभा केला आहे. मात्र हे प्रकरणाचा जातीय वादाकडे नेले जात आहे. सतेज पाटील माझ्यावरती पुरोगामीत व सोडल्याचा आरोप करत आहेत मात्र ते विशालगडावर कधी गेले आहेत का? असा सवाल यावेळी संभाजी राजांनी विचारला.

अहमदनगरमध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन, देशपातळीवर घेतली गेली दखल…

तसेच संभाजी राजे छत्रपती यावेळी संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर बोलताना म्हणाले की, या अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनामध्ये केवळ मुस्लिमांचेच अतिक्रम हटवण्यात आले नाही. तर हिंदुंचे देखील अतिक्रमणं हटवले गेले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला जातीय रंग दिले जाऊ नये. तसेच जलील मला पुरोगामित्वाबद्दल विचारतात. पण जेव्हा भीमा कोरेगाव आणि राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याची वेळ होती. ते संसदेत मी सुरू केलं. मी आवाज उठवला. जलीलल यांनी खासदार असून ते केलं नाही. असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण लाईटली घेतलं म्हणूनच..,; संभाजीराजेंनी A to Z सांगितलं

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश असतानाही सरकारने अतिक्रमणावर कारवाई केली नाही. शिवभक्तांनी जेव्हा अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली तेव्हा आता आरोप केले जात आहेत. अतिक्रमण काढण्याचे आदेश असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांना कोण प्रश्न विचारणार? असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी यावेळी केलायं.

तसेच सरकाकडून इतर वेळी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी बैठका घेतल्या जातात. एसआयडी, गोपनीय यंत्रणा वापरल्या जातात, विशाळगड अतिक्रमणाबाबत सरकारने ही यंत्रणा वापरली का नाही. सरकारनेच शिवभक्तांवर ही वेळ आणली असून इथल्या नेत्यांनी कधीच अतिक्रमणाबाबत आवाज उठवला नसल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय.

follow us