Download App

Sangli News : वंचित आघाडीच्या सभेत टिपू सुलतानचा फोटो; आंबेडकरांचं पोलिसांना थेट आव्हान

Sangli News : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सांगलीत सभा झाली. या सभेत व्यासपीठावर टिपू सुलतानचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) प्रतिमेला पुष्पहार घालू नये असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना भरसभेतच स्पष्ट शब्दांत इशारा दिला. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सांगली येथे वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी टिपू सुलतानच्या फोटोला हार घालून सभेला सुरुवात केली. टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला तर बघा असे काही जणांचे आदेश होते. पण, पोलीस खात्याला आवाहन आहे की पाच वर्षांनंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलते. आतापर्यं सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही. पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar : ‘ती’ वेळ आणू नका’ भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आंबेडकरांचा इशारा

आता सत्तेत जाण्यासाठी प्रयत्न करणार 

आज आम्ही टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला. मात्र काहींनी हार घालू नका असे सांगितले. तुम्ही टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला तर बघा, असा इशारा देण्यात आला होता. माझं पोलीस खात्याला आवाहन आहे की पाच वर्षांनंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलतं. आजपर्यंत आम्ही कधीच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, या निवडणुकीत आम्ही सत्तेत गेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. पोलिसांनी घटनेप्रमाणे वागायचं आहे. त्यांनी कायद्याप्रमाणं वागायचं आहे. सरकार जे सांगत आहे तसं वागू नका, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यानंतर सभेला उपस्थित नागरिकांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, की उद्याची सत्ता आपल्याला बदलायची आहे. यासाठी कटिबद्ध राहा.

 

follow us