सांगली शहरामधील वसंत कॉलनी येथील रिलायन्स ज्वेलर्सच्या शोरूमवर पोलिस मुख्यालयापासून अवघ्या दोन हजार फुटांवरील रविवारी भर दिवसा दरोडेखोरांनी गोळीबार करत शोरूममधून 13 कोटी रुपये किमतीचे दागिने लुटले आहे. या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दरोड्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक ग्राहक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु तो पर्यंत दरोडेखोर दागिने घेऊन पसार झाले होते. सांगली पोलीस दरोडेखोरांचा तपास करत आहेत. पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली आहे.
रविवारी दुपारी तीन वाजता आठ दरोडेखोर ग्राहक म्हणून शोरूममध्ये गेले. आणि आता गेल्यावर पोलीस असल्याचे सांगून शोरुमची तपासणी कराची आहे असे म्हणत ग्रहकांना बाहेर काढले. आणि शोरूममधील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखून बांधून ठेवले. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार देखील केला. या गोळीबारात एक ग्राहक जखमी जाळायची माहिती आहे. ताईच यावेळी दरोडेखोरांनी शोरूमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि शोरूममधील दागिने पोत्यात भरून पसार झाले.
यावेळी दरोडेखोरांनी 15 किलो सोने लंपास केले. तसेच 5 कोटी रुपये किमतीचे विविध रत्ने देखील यावेळी दरोडेखोरांनी लंपास केले आहे. रात्री उशिरा पर्यंत शोरूमधील शिल्लक दागिन्यांची मोजणी सुरु होती. हे दरोडेखोर स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. आणि ते त्याचा गाडीतून पसार झाले आहेत. पोलिसांना घटनासथळी काही गोष्टी सापडल्या आहेत. त्या आधारे पोलीस तपास करत आहेत. दरोडेखोर सोलापूर किंवा कर्नाटककडे पळाल्याची माहिती आहे. असे पोलिसांनी सांगितले.