Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara) पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तणाव निवळत चालला आहे. मागील तीन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात येत आहे. बुधवारी रात्री काही भागात आणि आज गुरुवारी काही भागात इंटरनेट सेवा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुसेसावळीतील घटनेनंतर प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मागील तीन दिवसांपासून बंद करण्यात आली होती. आता या दंगलग्रस्त भागातील तणाव निवळत आहे. बाजारपेठेसह सर्व व्यवहार आजपासूनच पूर्ववत होत आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर पुसेसावळी गावातील बंद मागे घेण्यात आला.
या निर्णयानंतर रविवारपासूनच गावातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. गावातील पोलीस बंदोबस्त मात्र अजून कायम आहे. संवेदनशील भागात टप्प्याटप्प्याने इंटरनेट सुरू करण्याची सूचना कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे काही भागात बुधवारी रात्री तर काही भागात गुरुवारी इंटरनेट सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. सोशल मीडियावर सायबर सेलचे लक्ष आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शेजारील कराडमध्येही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. राखीव दलाच्या तुकड्याही कराड शहरात दाखल झाल्या आहेत.
पुसेसावळीत दोन गटाचील धुमश्चक्रीनंतर तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन दिवस शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शांतता कायम रहावी यासाठी प्रशासनाची सर्वत्र करडी नजर होती. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने पुन्हा काही घडले नाही. त्यामुळे कालपासून कराड शहरातील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.
Weather Update : आज पाऊसधारा! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी