Download App

पवार चुकले मग काय गोळ्या घालणार का? सदाभाऊ खोत यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

Sadabhau Khot : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti sanghatna)अध्यक्ष सदाभाऊ खोत वादात अडकले आहेत. त्यातच आता खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करुन त्यांनी केलेल्या एका विधानाचे उदाहरण देत, जर पवार बोलताना चुकले असतील तर त्यांना तुम्ही गोळ्या घालणार का? असा सवाल आहे. साताऱ्यात(satara)माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा खळबळजनक विधान केल्याने शेतकरी नेते सदाभाऊ खोत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.(Satara sadabhau khot criticise on sharad pawar ncp)

Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये

सदाभाऊ खोत म्हणाले की, पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला असं बोलायचं होतं की, त्यांच्यासोबतचे सरदार चार दिशांना धावायला लागले आहेत. सेनापती गावगाड्याच्या दिशेने यायला लागले आहेत, अशा पद्धतीने मला त बोलायचं होतं. मात्र अनावधानाने सैतान हा शब्द त्या दिवशी आपल्याकडून गेला. कारण गावगाड्यामध्ये कोण आला तर सैतान आला काय असं सहज बोलत असतात.
|
‘पालकमंत्रीपदा’वरून तटकरे-गोगावलेंमध्ये राजकीय संघर्ष पेटला, मंत्रीपदावर गोगावलेंचा दावा

माझी देखील गावगाड्याची भाषा आहे. ही भाषा इंडियातल्या लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली. मात्र मला जे बोलायचं होतं ते सेनापती गावगाड्याकडे येत आहेत, त्यांना आता रोखूया, परत एकदा सरदारांची जमवाजमव होता कामा नये. शेतकऱ्यांचं खळं लुटता कामा नये, ही माझी त्यामागची भूमिका होती.

पत्रकारांनी खोत यांना विचारलं की, आपण आपलं वक्तव्य मागं घेत आहात का? त्यावर खोत म्हणाले की, मला जे म्हणायचं होतं ते मी आता सांगितलं. आता ज्यावेळी समृद्धी महामार्गावर अपघात झाला त्यात 25 लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी पवारसाहेब म्हणाले की ते देवेंद्रवासी झाले.

त्यांना तसं म्हणायचं होतं का तर नाही. ते कैलासवासी झाले, देवाज्ञा झाली असं म्हणायचं असेल. मात्र गेला असेल अनावधानाने शब्द मग काय गोळ्या घालता का मग? तसं असलं तर सांगा आम्ही येतो तिथं. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जे काही चाललं आहे याचा कीव जनतेला आला आहे.

2019 मध्ये गुण्यागोविंदाने भाजप-शिवसेनेचं सरकार आलं होतं, त्याच्यात फोडाफोडी कोणी केली? असा सवालही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Tags

follow us