Letsupp Special : अमोल कोल्हे यांनीच भाजपचे दरवाजे ठोठावले; आता चावी आढळरावांकडे!
पुणे : अमोल कोल्हे यांनीच भाजपचे दरवाजे ठोठावले होते. त्यांना माहित आहे की याची चावी आढळरावांच्या खिशात आहे. म्हणून ते परत गेले आहेत, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले होते, असा मोठा दावा शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. (NCP MP Amol kolhe eagerly waiting to join bjp, Said ex mp shivajirao Adhalrao patil)
शिवाजीराव आढळळराव पाटील यांनी पवार साहेबांचे दरवाजे ठोठावले होते, पण त्याची चावी माझ्याकडे आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी केला होता. या दाव्याला आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, हा किती पोरकटपणा आणि बालिशपणा आहे. मुर्खाच्या नंदनवनात वागण्यासारखं हे विधान आहे.काही कारण नाही. शरद पवारांकडे दरवाजा ठोठवण्याचा काय संबंध आहे माझा? मी एकनाथ शिंदेंसोबत समाधानी आहे, त्यांनी मला ताकद दिली आहे. उलट अमोल कोल्हे यांनी भाजपचे दरवाजे ठोठवले होते. त्यांना माहित आहे की चावी अढळरावांच्या खिशात आहे. म्हणून ते परत गेले आहेत.
Yugendra Pawar : शरद पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये
अन्यथा कधी भाजपसोबत फ्लर्ट करायचं. अजितदादांच्या शपथविधीला जायचं. शरद पवारांना सांगायचं मी राजीनामा देतोय. जनतेला सांगायचं मी राजीनामा द्यायला निघालोय. नंतर साहेबांना सांगायचं मी राजीनामा दिलाय काय करु? कोणत्या जगात वावरत आहात तुम्ही? पवार साहेब लोकमान्य नेते आहेत. ते माझ्या जागेवर उभे राहणार होते. मी ती जागा मोकळी न केल्यामुळे त्यांना दुसरीकडे जावं लागलं. तेव्हापासून त्यांचा आणि माझा संबंध नाही. मी का जाऊ त्यांच्याकडे? उगाच काही तरी बोलायचं.
मोदी सरकारला सुप्रीम झटका! ईडी प्रमुखांना दिलेली मुदतवाढच बेकायदेशीर
काय म्हणाले होते अमोल कोल्हे :
राज्यातील सत्तांतराननतर शिरूर लोकसभेच्याआजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली होती. अमोल कोल्हे जनतेच्या मनातून उतरले आणि ते आता बिनकामाचे खासदार बनलेत अशी टीका आढळराव पाटील यांनी केली होती.राष्ट्रवादीची लोकं नाराज आहेत. आता त्यांना एकत्रित राष्ट्रवादीमधून तिकीट मिळालं असतं तरी त्यांचा टिकाऊ लागला नसता, असं ते म्हणाले होते. यावर अमोल कोल्हे यांनी पलटवार करत आडू आडून पवार साहेबांची भेट घेण्यासाठी आढळराव पाटील प्रयत्न करीत आहे. परंतु त्या भेटीची चावी आता माझ्या हातात आहे, असं म्हंटलं होतं.