Kolhapur News : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या भाजपात जाण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा दावा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कोल्हापुरात सतेज पाटलांसह अनेक नेते भाजपात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी दुजोरा दिला आहे.
Gauri Khan: ‘अभिनय करणं सर्वात वाईट प्रोफेशन’; शाहरुख खानच्या पत्नीने थेटच सांगून टाकलं
राजेश क्षीरसागर म्हणाले, सतेज पाटील यांचे दोन नंबर धंदे आहेत. देशातून आता मोदी सरकारची जाणार नाही. यातून वाचवण्यासाठी सतेज पाटील भाजपात जाण्यासाठी हालचाली करत असल्याचं कानावर आलं असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होणार ‘अॅनिमल’; कुठे अन् कधी पाहाल?
सतेज पाटील यांनादेखील काँग्रेसमधून कड काढावी लागणार आहे. आपल्यालाही भाजपमध्ये जावे लागेल, अशा हेतूने आमदार सतेज पाटील यांनी वक्तव्य केलं. सतेज पाटील पुढील काही दिवसांत भाजपमध्ये जाणार असल्याचं भाकीतही राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे. राजेश क्षीरसागर यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
PM मोदींच्या सेल्फी बूथसाठीच्या खर्चाची माहिती दिल्यानं रेल्वे अधिकाऱ्याची बदली, कॉंग्रेसचा आरोप
याआधी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं लेखी पत्राबाबत सतेज पाटलांनी स्पष्ट केलं होतं. सतेज पाटलांच्या या दाव्यावर राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, सतेज पाटील यांचे दोन नंबरचे व्यवसाय असून त्यातून वाचण्यासाठी त्यांची पळता भुई थोडी झालेली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपात जाणार असल्याचं क्षीरसागर म्हणाले आहेत.
शिवसेनेचे बोट धरुन सतेज पाटील पहिल्यांदाच विधानसभेत गेले होते. निवडून आल्यानंतर ते शिवसेनेला विसरुन काँग्रेसला जवळ करत आहेत. शिवसेनेचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याचं सतेज पाटील म्हणाले होते, ते काय ज्योतिषी आहेत काय? असा खोचक सवालही क्षीरसागरांनी यावेळी केलायं.
सतेज पाटील काय म्हणाले होते?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी दोन वेळा प्राथमिक चर्चा झाली असून शेवटपर्यंत आम्ही त्यांना आमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी पत्र दिले आहे. १० जानेवारीच्या आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून आहे, असा दावा सतेज पाटील यांनी केला होता.