मामांच्या राजीनाम्यावर Satyajeet Tambe बोलले, पुन्हा पटोले निशाण्यावर

अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस (Congress) पक्षाने याचं आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency) नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळातील गट नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेर तालुक्यातील […]

Untitled Design (6)

Untitled Design (6)

अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासारख्या नेत्यांवरती जर राजीनाम्याची वेळ येत असेल तर काँग्रेस (Congress) पक्षाने याचं आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency) नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळातील गट नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच तांबेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा मंदिराजवळ माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तन कार्यक्रमासाठी सत्यजित तांबे उपस्थित राहिले होते. त्यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

तांबे म्हणाले की, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. मी यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करणार नाही.

परंतु ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर अनेक वर्ष काम केले असेल. आणि त्या ज्येष्ठ नेत्यांवर गटनेते पदाचा राजीनामा देण्याची वेळ येत असेल. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी नाराजी तांबे यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. पण खरंच त्यांनी पत्र लिहिलेलं असेल किंवा राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जे कुटुंब शंभर वर्षे पक्षासोबत एकनिष्ठेने राहिले आहेत त्यांच्यावर ही वेळ का येतीय याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version