Download App

Ram Shinde नी काँग्रेसला डिवचले: Satyajeet Tambe भाजपच्या सहकार्याने निवडून आले

अहमदनगर : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात झालं ते काँग्रेसची (Congress) अंतर्गत बाब आहे. कुणी कुणाचा गेम लावला, कुणी कुणाचा गेम केला, याच्याशी भाजपाला (BJP) काहीही कर्तव्य नाही. त्यांची सुदोपसुंदी लढाई काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसची समुळ नष्ट होण्याकडे त्यांची वाटचाल सुरु आहे, अशी टीका भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी काँग्रेसवर केली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेत. उमेदवाराने देखील भाजपचे आभार मानले आहेत. भाजपने संपूर्ण मतदार संघात त्यांच्या पाठीशी ताकद उभा केली. आणि त्यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे, असे राम शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरचे प्रभारी आहेत ते जिल्ह्यात येण्याच्या आधीच इतर पक्षाची पडझड सुरु झालीय. देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आल्यावर काय होईल हे पाहात रहा, असे भाजप आ.राम शिंदे यांचे सूचक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. पुढील काळात सत्यजित तांबे काय भूमिका घेणार, या प्रश्नांवर बोलताना त्यांनी, “अपक्ष म्हणून निवडून आलो त्यामुळे अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार.” अशी भूमिका मांडली.

Tags

follow us