Shahajibapu Patil यांचं 2 हजार कोटींच्या आरोपावरुन संजय राऊतांना प्रत्युत्तर

सोलापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजप (BJP)व एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. त्यातच आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एक गंभीर आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिवसेना नाव […]

Shahajibapu

Shahajibapu

सोलापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजप (BJP)व एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. त्यातच आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एक गंभीर आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिवसेना नाव आणि चिन्हासाठी आतापर्यंत रुपये 2 हजार कोटींचा सौदा झाल्याचं संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे म्हटलंय. त्यावर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil)यांनी घणाघाती टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, जनसामान्यांत मनात लोकाशाही विषयी शंका निर्माण करण्याचं चुकीचं काम संजय राऊत करत आहेत. भक्कम पुराव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्व निकाल लागत असल्याने, संजय राऊतांची मानसिकता ही बिघडलेली आहे. ते सध्या या देशातील लोकशाही बिघडवण्यासाठी, समाजातील मानसिकता बिघडवण्याचं काम करत आहेत आणि हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे.

Sushma Andhare : यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र

त्याचबरोबर सध्या संजय राऊत हे नागापेक्षाही विषारी फुत्कार हे त्यांच्या तोंडातून टाकत आहेत. मला खात्री आहे हा महाराष्ट्र सुजान आहे, बुद्धीमान आहे. राजकारणाचे परीपक्व राज्य म्हणून या राज्याकडे पाहीलं जातं. असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

याशिवाय संजय राऊत यांच्याकडून सातत्यानं होणारी टीका म्हणजे सकाळचा पंधरा मिनिटांचा पुढारी आहे. महाराष्ट्र कसा भडकवायचा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कसं भडकवायचं असं कुटील कारस्थानी गुण जन्मजात राऊत यांच्याकडे आहेत. अशी बोचरी टीका आमदार शहाजी बापू यांनी या अगोदर संजय राऊतांवर केलेली आहे.

Exit mobile version