Download App

अखेर शांताबाईंना मिळणार न्याय, बच्चू कडूंची ‘प्रहार’ आली धाऊन

सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे.

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी घरासाठी जागा मिळवून दिली होती. मात्र, भारुडांची बदली झाली आणि हा विषय मागे पडला. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेल्या लोककलावंत शांताबाई काळे यांना भाड्याच्या घरात कसेबसे दिवस काढण्याची वेळ आली होती.

आता इथून पुढे जोपर्यंत शांताबाईंच पक्क घर तयार होत नाही तोपर्यंत घराचं भाडं आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्षाने दाखवली आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर दोन पक्क्या खोल्या बांधून दाखवण्याची ही जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्ष घेणार आहे. त्यामुळे शांताबाईंच्या घराची प्रतीक्षा सध्या तरी संपल्याच दिसून येत आहे.

Tags

follow us