राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांची खोचक टिपण्णी

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर […]

Untitled Design (30)

Untitled Design (30)

कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर पवार म्हणाले की, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले आहेत.

महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना अबाधित ठेवली. महाराष्ट्रातील हे पहिले राज्यपाल आहेत, त्यांच्याबद्दल सतत चर्चेत आहेत. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागतेय, अशी टीकाही शरद पवार यांनी केलीय. त्यांच्याकडून सतत चुकीची वक्तव्य करतात, त्यामुळं जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागतेय हे चांगलं नाही. शेवटी हे पद महत्त्वाचं आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली जात नसल्याचा आरोप देखील पवार यांनी यावेळी केलाय.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते की, राज्यपाल पद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल बनणं म्हणजे दुःखच दुःख आहे. यात कोणतेही सुख नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

Exit mobile version