सध्या कोल्हापूर एस टी को ऑप बँक निवडणुकी रणधुमाळी सुरु आहे. या निवडकीसाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunaratna-sadavarte) देखील मैदानात उतरले आहेत. आज कोल्हपूरयेथे पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्तेनीं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष केले. (Sharad Pawar Ideological Virus, Gunaratna Sadavarta’s attack on bank elections)
सदावर्ते म्हणाले शरद पवार वैचारिक व्हायरस आहे. त्याला निर्जंतुक करणे यासाठी एस टी को ऑप बँक निवडणुकीत उतरलो. शरद पवार यांची सत्ता बाजूला करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनी चालक-वाहक यांना कधी उमेदवारी दिली नाही. आम्ही कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी एस टी जनसंघ संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीत उतरलो आहोत. असे यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणतात.. 33 हजार मराठा आज आमच्या सोबत आहे. आम्ही सर्वाधिक उमेदवार दिले आहेत. कोल्हापूरमध्ये जे आम्ही पाहिलं , काही हिंदू तरुण लांबून पाहत होते त्यांची गुन्ह्यात नावं आली आहेत. याबाबत मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. हसन मुश्रीफ यांचे देखील आम्ही काही चालू देणार नाही. पहिल्यांदा ही भूमिका आम्ही घेतली आहे.
लव्ह जिहादबाबत बोलताना सदावर्ते म्हणतात लव्ह जिहादच्या संदर्भाने मुंबईत आम्ही सगळ्यात मोठा मोर्चा काढला. लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर व्हॉट्स अप जिहाद सुरू झालं आहे. याबाबत अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार आहे. पोलीस यंत्रणेला देखील याबाबत पत्रव्यवहार करणार आहे.
या लोकांनी लादलेले विचार आम्ही स्वीकारू शकत नाही. संजय राऊत यांच्यासारखी पत्रकारिता पाहिली नाही. कळते, समजे याच्या पलिकडे काही नसते. त्यांच्या विचाराला आम्ही केराची टोपलीत टाकतो. राष्ट्रवादी काँग्रेस हा कौटुंबिक पक्ष आहे. दोन ते तीन जिल्ह्यापुरता राहिला आहे. हा पक्ष देखील संपून जाईल. त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील असा टोला यावेळी त्यांनी लगावला.