Download App

रयतमध्येही भाकरी फिरली नाही; अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

Sharad Pawar on Ryat Shikshan Sanstha : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत शरद पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले आहे. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर (Vitthal Shivankar) यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.

कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. आज त्या निवडी होणार होत्या. मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, अजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडाळाचे सदस्य यांची निवड करण्यात आली. विठ्ठल शिवणकर यांनाच सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे. कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड 27 मे रोजी पुण्यात होणार आहे.

काश्मीर फाइल्सच्या दिग्दर्शकानं धाडली ममता बॅनर्जींना नोटीस; नेमकं प्रकरण काय?

नेमण्यात आलेले उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष – जयश्री चौगुले (वाशी), अरुण कडू पाटील (उरण), अॅड. राम कांडगे (पुणे), महेंद्र लाड (पलूस)
आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवनकर, विनोद कुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे
व्यवस्थापक मंडळाचे सदस्य – ॲड. भगीरथ शिंदे, माजी मंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, मीना जगधने, आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकू कोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम आणि धनाजी बलभीम पाटील
आजीव सेवक प्रतिनिधी – नवनाथ जगदाळे, डॉ. संजय नगरकर, ज्योस्ना सुधीर ठाकूर

Tags

follow us