Download App

Shivaji Kardile :अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच कर्डिलेंकडून मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देऊन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष झालेले शिवाजी कर्डिले यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. अध्यक्षपदाचे सूत्र स्वीकारताच अनेक महत्त्वाच्या घोषणा ही कर्डिले यांनी केल्या आहेत. बँकेतील नोकर भरती, व्यवसायिक, महिला बचत गटांसाठी मदत आणि राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मदत अशा घोषणा कर्डिले यांनी केल्या आहेत.

कर्डिले म्हणाले, अहमदनगर जिल्हा बँकेवर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला दोन वेळेस चेअरमनपदाची संधी मिळाली आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कारखानदार, व्यवसायिक व महिला बचत गट यांना मदत केली जाईल. आज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पदभार स्वीकारला आहे.

Uddhav Thackeray : बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दिलासा पण गौरी भिडे सुप्रीम कोर्टात जाणार

बँकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी लवकरच सातशे कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्यानंतर उर्वरित पाचशे कर्मचाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्याचे काम केले जाईल. तसेच बँकेचे आधुनिकीकरणही केले जाईल, असे कर्डिले म्हणाले. त्याचबरोबर कर्डिले यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांना टोल लगावला आहे. मला विश्वासात घेतले असते तर ही निवडणूकही झाली नसते, असे कर्डिले यांनी म्हटले आहे.

यावेळी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अक्षय कर्डिले, बाबासाहेब भोस, प्रशांत गायकवाड, संचालिकाअनुराधा नागवडे, मीनाक्षी पठारे. अंबादास पिसाळ. अमित भाकरे, अमोल राळेभात आदी उपस्थित होते.

बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एका मताने पराभव केला आहे. कर्डिले यांनी बँकेचे अध्यक्षपद मिळविल्याने त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्जतच्या कार्यक्रमात कौतुक केले आहेत. तर राष्ट्रवादीचा घुले हे पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आता वाद सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत.

Tags

follow us