Ahmednagar News : पोलिस मित्रांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला, सिनेस्टाईल पाठलाग करून गाठलं पण..,

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]

Shrigonda Crime News

Shrigonda Crime News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं.



नेमकं काय घडलं?

बुधवारी रात्रीच्या गस्त दरम्यान खरातवाडी येथे चोर आल्याची माहिती पोलिसाना मिळाली. माहिती मिळताच रात्रगस्तीवरील बेलवंडी पोलीस ठाण्याचे शेख यांनी तात्काळ इतर जवळच्या गावांना ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत माहिती दिली. ही माहिती कळताच पिंपळगाव पिसा येथील पोलिस पाटील सुनील शीवनकर यांनी प्रतिसाद देत गावातील पोलिस मित्र योगेश डोईफोडे, सागर डोईफोडे, विजय वाजे, किरण सरोदे, सुहास सरोदे सह गस्त सुरू केली.

उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’

चोरटयांनी गावात एन्ट्री करताच त्यांची नजर पोलीस मिंत्रावर पडली. त्यांना पाहतच चोरट्यांनी बाईकवरुन धूम ठोकली. चोरट्यांना पाहताच पोलीस पाटील स्वतः पोलीस मित्रांसह चारचाकीने त्यांचा अगदी सिनेस्टाईल पाठलाग करू लागले. त्यांनी चोरट्यांना ओव्हरटेक केलं, याचदरम्यान चोरट्यांचा तोल जाऊन ते मोटारसायकलसह बाजूच्या उसाच्या शेतात पडले.

Gadar 2 Trailer: बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर 2’ चा ट्रेलर प्रदर्शित

NASA ; ‘नासा’ची 90 मिनिटं बत्ती गुल, कट्टर दुश्मन धावला मदतीला

चोरांनी मोटारसायकल सोडून अंधाराचा फायदा घेवून पलायन केले. त्यावेळी चोरांच्या सोबत असलेली हत्यारे, तसेच चोरांनी चोरून आणलेल्या कोंबड्या ही तेथेच सोडून पळून गेले. बेलवंडी पोलिसांनी तात्काळ श्वान पाचारण करून आरोपींचा शोध घेतला असता त्यांना आरोपींच्या पलायनाची निश्चित दिशा समजली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी पोलिस मित्रांचं कौतुक करुन सन्मान केला आहे. तसेच घटनेनंतर गावातील पोलिस पाटलांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित करुन सदर यंत्रणेचा वापर करुन गुन्हे प्रतिबंधासाठी सहकार्य करण्याचं आवाहन, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं आहे. तसेच गावागावातील सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांनीही आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणेचे थकीत बिल ग्रामनिधीतून भरून तात्काळ आपल्या गावातील ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करून घ्यावी. तसेच लोकवर्गणीतून वा ग्रामनिधीतून गावागावात वाड्या वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. इतरही पोलीस अधिकारी कर्मचारी यांनीही ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version