सिद्धेश्वर एक्सप्रेस लुटण्यासाठी महिलांनी रचला कट; आरपीएफने टोळीचा डाव ‘असा’ उधळविला !

Siddheshwar Express-गाडी रेल्वे स्टेशनवर येताच नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिला धाराशिव जिल्ह्यातील आहेत.

Railway Roberry

Railway Roberry

Siddheshwar Express : सोलापूर, दौंड रेल्वे मार्गावर रेल्वे लुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातील अनेक आरोपी आरपीएफने गजाआड केलेत. सोलापूरला जात असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस दरोडा (Siddheshwar Express) टाकण्याचा प्लॅान नऊ महिलांनी रचला होता. परंतु दरोडा टाकण्यापूर्वीच जेऊर रेल्वे स्टेशनवर टोळी आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यांनी जेरबंद केली आहे. बुधवारी रात्री जेऊर रेल्वे स्टेशनवर आलेल्या रेल्वे गाडीतील प्रवाशांना या टोळीला लुटायचे होते.

बंगाल अन् तमिळनाडूत बंपर मतदान; सत्ता बदल होणार की सत्ताधारी मारणार बाजी?

गुन्हे शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे हे बुधवारी रात्री कुर्डुलवाडी स्थानकावर ड्युटी करत होते. तेव्हा तीन महिला संशयास्पद रित्याने फिरताना त्यांना दिसला. या महिलांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकावरून जाण्यास सांगितले. पण त्या महिला लातूर एक्सप्रेसमध्ये चढताना दिसल्या. त्यामुळे शिवाजी मुंडे यांनी सोलापूर पथकाला ही माहिती देऊन संपूर्ण मार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या महिला जेऊर स्थानकावर उतरल्या.

‘जोकर रूटीन सुरूच’: सुकेश चंद्रशेखर वर पुन्हा एकदा जैकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या लेटर स्टंटवर टीका

त्याचवेळी स्टेशनवर आलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये या महिला घुसल्या. तोपर्यंत आरपीएफचे एक पथक तिथेच तैनात होते. तर सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एस्कॉर्टिंगमधील सदस्य हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना, कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना संदेश देत होते. तसेच छायाचित्रे प्रवासी इत्यादींच्या मदतीने संशयितांवर पाळत ठेवत होते.


सोलापूर स्टेशनवर गाडी आली अन्

लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्यासह आरपीएफ कर्मचाऱ्यांचे एक पथक सोलापूर स्टेशनवर तयार होते. गाडी रेल्वे स्टेशनवर येताच नऊ महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिला 18 ते 40 वर्षे वयोगटातील असून, त्या महिला धाराशिव जिल्ह्यातील आहेत. या महिला कुर्डूवाडीच्या जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले असून, या महिलांविरुद्ध दरोड्याची तयारी केल्याच्या प्रकरमात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version