Download App

दिपाली सय्यदचे काँग्रेसला खिंडार; श्रीगोंद्यात सहा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसला धक्का दिला आहे. मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला.

श्रीगोंदा नगरपालिकेत शिंदे गटाचा पुढील नगराध्यक्ष करण्यासाठी दिपाली सय्यद यांचे प्रयत्न आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या वर्षा बंगल्यावर पाठपुरावा करीत होत्या. यातूनचं त्यांनी काँग्रेसला श्रीगोंदा येथे झटका दिला आहे.

शिंदे गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. दिपाली सय्यद यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला आहे. दिपाली सय्यद याही लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

दिपाली सय्यद या शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा चार महिन्यापासून सुरु आहे. पण ऐनवेळी हा पक्षप्रवेश रद्द झाला. गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विरोध करत आधी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे.

त्यात प्रदेश महिला जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी, ठाण्यातील माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिपाली सय्यद यांनी खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती.

आमचा सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्यांनी भाजपा नेत्यांची माफी मागावी आणि महिला आघाडीच्या नेत्यांविरोधातील खोटी तक्रार मागे घ्यावी , असे भाजपने म्हणणं आहे.

Tags

follow us