Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Solapur DCC Bank Election) निवडणुकीत भाजपने (BJP) मोठी राजकीय आघाडी घेतलीय. भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलच्या दहा जागा बिनविरोध झाल्यात. तर नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे बँकेवरील भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. विशेष म्हणजे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनीही भाजप पुरस्कृत पॅनेलला साथ दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही मुलांचीही बँकेत एन्ट्री झाली आहे.
IPL 2027 Retention : मोठ्या खेळाडूंना धक्का ; बोल्ट,स्टार्कसह अनेक दिग्गज खेळाडू रिलीज
भाजपच्या 10 उमेदवारांची बिनविरोध बाजी!
आतापर्यंत 19 पैकी 10 जागांवर पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर आवताडे, पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे.
राजन पाटील यांचे दोन्ही मुले जिल्हा बँकेत
माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही मुले विक्रांत उर्फ बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील हे संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत. इतर मागास प्रवर्गातून अजिंक्यराणा पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सतेज पाटलांवर मोठी जबाबदारी; स्क्रीनिंग कमिटीवर नियुक्ती, दिला मोठा शब्द
बाबासाहेब देशमुखांची भाजप पॅनेलला साथ!
या निवडणुकीत एक सर्वाधिक लक्षवेधी घडामोड घडलीय. सांगोला मतदारसंघातील शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलमधील सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणातील या समीकरणामुळे भाजपची ताकद वाढली आहे.
धैर्यशील मोहिते-पाटलांची माघार; राजकीय समीकरणांना धक्का
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पणन आणि दुग्ध संस्था या दोन्ही मतदारसंघांमधून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
