Download App

96 वर्षांच्या वृद्धाची निवेदनासाठी धडपड; फडणवीसांशी बोलता बोलताच आली भोवळं अन्…

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज सोलापूर (Solapur)दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान फडणवीसांनी सोलापूरमधील महसूल भवनाचे उद्घाटन (Inauguration of Revenue Building)केले. याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यावेळी फडणवीसांनी तात्काळ मदत करत त्यांच्याशी बातचीत केली. विलास शहा (Vilas Shah)असं या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

नेतेमंडळींना झटका! वाढदिवस, राजकीय कार्यक्रमात बैलगाडा शर्यतींना ब्रेक

देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ पाणी मागवले. त्या ठिकाणी असणारी गर्दी कमी करत जागा मोकळी केली. सामाजिक कार्यकर्ते 96 वर्षांचे आहेत. विलास शहा गेल्या अनेक वर्षांपासून कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी शहांनी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली आहेत. असं असलं तरी त्यांनी केलेल्या आंदोलनांची मात्र कोणीही दखल घेतली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोलापूरमधील महसूल विभागाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते (Senior Social Worker)विलास शहा हे फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आले. त्यावेळी फडणवीसांशी बोलत असताना अचानक भोवळ आली.

सोलापूरमधील जवळचा कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देताना शहांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विलास शहांना सावरत पाणी पाजले. त्यानंतर शहा यांच्या तब्येतीची विचारपूस करुन फडणवीसांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. आजपर्यंत शहांनी जिल्ह्यातील विविध अडचणींवर आवाज उठवला आहे.

Tags

follow us