नेतेमंडळींना झटका! वाढदिवस, राजकीय कार्यक्रमात बैलगाडा शर्यतींना ब्रेक
Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी सशर्त परवानगी कायम ठेवली होती. यानंतर आता राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार बैलगाडा शर्यती धार्मिक सण उत्सव, यात्रा यांसाठीच भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रम आणि वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे.
आयुक्तालयाच्या या निर्णयामुळे राजकीय नेत्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. आगामी काळात निवडणुका आहेत. बैलगाडा शर्यती भरवून पंधरा ते वीस हजार किंवा त्यापेक्षाही जास्त गर्दी सहज जमवता येईल, असाही त्यांचा प्लॅन होता. पण, आता मात्र असे काहीच करता येणार नाही. त्यामुळे या शर्यतींचा आव्वाज फक्त यात्रा आणि धार्मिक सण उत्सवांतच घुमणार आहे.
Sanjay Gaikwad :’एकनाथ शिॆदेच्या पैशांवर…’ राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर शिंदे गटाचा धक्कादायक खुलासा
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने 24 मे रोजी पशुसंवर्धन खात्यामार्फत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कशी होणार याची माहिती दिली आहे.
राजकीय कार्यक्रम, वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतींना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ नये. शर्यतीच्या आयोजकांना परवानगीसाठी 15 दिवस आधी अर्ज करावा लागेल. तसेच 50 हजार रुपयांची बँक गॅरंटीही द्यावी लागणार आहे. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटी सदस्यांची समिती या शर्यतींवर नजर ठेवतील. शर्यतीदरम्यान बैलांचा छळ झाला किंवा प्राणी प्रतिबंधक कायद्याचाचे उल्लंघन झाले तर कायदेशीर कारवाई होईल, असे म्हटले आहे.
Video : बैलगाडा शर्यत : फडणवीसांचा ‘तो’ अहवाल ठरला महत्त्वाचा…
दरम्यान, पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. राजकीय कार्यक्रम, नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त तर या शर्यती असतातच. या शर्यतींच्या माध्यमातून मोठी गर्दी जमवायची. जिंकणाऱ्यांना महागडी बक्षीसे द्यायची अन् त्यातून अमाप लोकप्रियता मिळवायची असा या नेत्यांचा फंडा होता. पुढे निवडणुकीतही याचा फायदा मिळत होताच. पण, आता सारेच फिसकटले आहे. आयुक्तालयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या नेते मंडळींच्या उत्साहावर पाणी पडल्याचे दिसत आहे.