हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

Solapur Hotel Owner Suicide : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजिंक्य जयवंत राऊत (वय 55 वर्षे ) असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. सोलापुरातील लेडी डफरिन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या दरम्यान हॉटेल ध्रुव हे राऊत यांचं हॉटेल आहे. त्यांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (19)

Crime

Solapur Hotel Owner Suicide : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजिंक्य जयवंत राऊत (वय 55 वर्षे ) असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. सोलापुरातील लेडी डफरिन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या दरम्यान हॉटेल ध्रुव हे राऊत यांचं हॉटेल आहे. त्यांच्या आत्महत्येने शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. ( Solapur Hotel Owner Suicide by Shooting himself )

आमचं तुमच्याकडे लक्ष आहे पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही; अजित पवारांच्या टोलेबाजीवर जयंत पाटील निशब्द

अजिंक्य जयवंत राऊत यांचे वडिल हे दिवंगत डॉ. जयवंत राऊत हे निष्णात शल्यविशारद होते. राऊत यांचं कुटुंब शहरातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराणं आहे. त्यांचा मोठा परिवार आहे. तसेच मित्र परिवार देखील त्यांचा मोठा आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टी आणि उद्योजक असा त्यांचा विविध क्षेत्रात मित्र परिवीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाण्यातील महाविद्यालयात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आले नाही. मात्र अजिंक्य राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र आज त्यांनी त्याच्या राहात्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ते शहरातील विजापूर रस्त्यावरील इंदिरानगरमध्ये राहत होते.

राऊत यांनी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तेव्हा शेजारच्या खोलीत असलेल्यात त्यांच्या पत्नी धावून आल्या. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रूग्णवाहिका मागवून त्यांचे पती अजिंक्य यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकणी सोलापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version