आईची माफी मागितली ! मुख्याध्यापकासह कुटुंबाने सामूहिक जीवन संपविले, शेअर बाजारात कोट्यवधीचे नुकसान

solapur -योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते गावाकडे आले होते. पाटील हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत होते.

Solapur News

Solapur News

सोलापूर : शेअर मार्केटमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीतून एक कुटुंबाने जीवन संपविले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात मुख्याध्यापकाने पत्नी, दोन लहान मुलांना विष देऊन ठार केले. त्यानंतर स्वतः विष घेत घरात गळफास घेऊन जीवन संपविले आहे. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत.

योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते गावाकडे आले होते. पाटील हे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत होते. शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेले. त्यांच्यावर 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले होते. नातेवाइकांकडूनही पैसे घेतले होते. परंतु पैसे परत केले जात नव्हते.कर्जाचा हा डोंगर आणि वसुलीसाठी होणारा मानसिक ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विवंचनेत होते. त्यातून गावाची घरी त्यांनी दोन चिमुरडे, पत्नी यांना आधी विष दिले. त्यानंतर योगेश पाटील यांनी विष घेतले आहे. त्यानंतर आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैराळ पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


आईची माफी मागून जीवन संपविले

घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईट नोट आढळली आहे. शेअर्स मार्केटमध्ये कसा फायदा झाला, कसा तोटा झाला आहे, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. योगेश पाटील यांना वडिल नाहीत. त्यांनी आईची माफी मागून जीवन संपविले आहे. नातेवाइकांकडून कसे पैसे घेतले होते. ते ही परत करता येत नाही. हे त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

घरासमोर नातेवाइकांचा आक्रोश

ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटील यांचे नातेवाइक जमा झाले आहेत. या सामूहिक आत्महत्येमुळे गाव हादरले आहे. नातेवाइकांनी आक्रोश केला आहे.

Exit mobile version