Sujay Vikhe : खासदार विखेंसमोरच राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी खासदार विखे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. […]

Untitled Design (23)

Untitled Design (23)

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एका कार्यक्रमाला खासदार सुजय विखे यांची उपस्थिती होती. मात्र या कार्यक्रमातच शाब्दिक वाद झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. यावेळी खासदार विखे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Sujay Vikhe Patil : भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची | LetsUpp Marathi
नगर-दौंड महामार्गाचे सगळे काम पुर्ण झाले आहे, मात्र लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) (Shrigonde) येथील रेल्वे गेट परिसरातील तीन किलोमीटर अंतराचे काम रखडले आहे. या कामासाठी साडेतीन कोटींचा निधी खासदार डॅा. सुजय विखे (sujay Vikhe) यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. हा कार्यक्रम सुरु असतानाच भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीचे नेते व बाळासाहेब नाहाटा यांनी खासदार सुजय विखे यांचे कौतुक केले. त्यांच्याकामाबाबत त्यांनी अभिनंदन केले. यावेळी अॅड. काकडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे चिडलेल्या नाहाटा आणि काकडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले.

त्यामुळे येथ काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी हस्तक्षेप करुन हा वाद तात्काळ मिटवला. विखे म्हणाले, सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद निवडणूका होवू द्या सगळे ठिक होईल, असेही विखे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले, विकासाचा प्रश्न आहे.कार्यकर्त्यांना मने मोकळे होण्याची जागा नसल्याने अशा कार्यकर्त्यांना संधी मिळते. सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत यापुर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर सगळे म्यूट म्हणजे मूक दिसले असते थोड्या दिवस थांबा श्रीगोंद्यातही तेच दिसणार आहे, असे विखे म्हणाले.

Exit mobile version