अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक आमदार आला, तर ते आनंदोत्सव साजरा करतात. परंतु, पुढच्या वेळी त्यांचा ताे आनंदही राहणार नाही, अशी टीका खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केली.
नगरमध्ये आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले आदी उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी नगर एमआयडीसीच्या विस्तारणीकरणासाठी आरक्षित केलेल्या जमिनींबाबतची महत्वाची माहिती दिली. विखे म्हणाले, नगर एमआयडीसीच्या विस्तारणीकरणासाठी वडगावगुप्ता व पिंपळगाव माळवी येथील आरक्षित केलेल्या ४६१ हेक्टर क्षेत्र जमिनीची प्रक्रिया रद्द करण्यात आली. हा निर्णय नुकताच सरकारच्या उद्याेग मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कात पडलेला ‘औद्योगिक क्षेत्र’चा शिक्का पुन्हा काढण्यात येणार असून त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुढे बोलताना डाॅ. विखे पाटील म्हणाले, अहमदनगर एमआयडीसीच्या विस्तारणीकरणासाठी आरक्षित केलेल्या बहुतांशी जमिनी बागायती हाेत्या. शेतकऱ्यांचाही जमिनी देण्यावरून माेठा विराेध हाेता. त्यामुळं शेतकरी हिताचा विचार करून त्यासाठी आपणही सातत्याने पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा आरक्षण उठवण्याचा निर्णय नुकताच उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी घेतला.
संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत…
त्याचप्रमाणे साकळाई याेजना, कुकडीच्या कालव्याचे अस्तरीकरणाचे प्रश्नही मार्गी लावले आहे. ३० वर्षांपासून साकळाई प्रश्नासाठी अनेकदा आंदाेलने, अर्ज, निवेदने देऊनही दाद मिळत नव्हती. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर ३५ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई याेजनेच्या सर्वेक्षणाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मंजुरी दिली.
यंदा होळीत अर्पण करा ‘या’ 5 गोष्टी, आर्थिक संकट होईल दूर
पुढील काळातही सातत्याने या याेजनेचा पाठपुरावा करून साकळाईचे काम पुर्णात्वास नेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अहमदनगर शहरातील प्रत्येक गल्लीत येत्या सहा महिन्यात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. आगामी काळात कॅन्टाेन्मेंट बाेर्डाचा महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.