सोलापूरसाठी प्रणितीच योग्य उमेदवार, हायकमांडकडे शब्द टाकणार : लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदेंची फिल्डिंग

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा (Lok Sabha) उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार आहे. सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीच योग्य उमेदवार आहेत, असं म्हणत काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली आहे. ते सोलापूरमधून माध्यमांशी बोलत होते. माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे या […]

Praniti Shinde Is Praniti Shinde really confident of winning or is she over confident?

Praniti Shinde

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा (Lok Sabha) उमेदवारीसाठी हायकमांडशी बोलणार आहे. सोलापूर लोकसभेसाठी प्रणितीच योग्य उमेदवार आहेत, असं म्हणत काँग्रेसने (Congress) त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली आहे. ते सोलापूरमधून माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती शिंदे या योग्य उमेदवार आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांवर तिचे प्रभुत्व आहे. ज्या पद्धतीने ती सभागृहात बोलते, त्याचा परिणाम संपूर्ण देशात होतो. त्यामुळे माझी अत्यंत स्पष्ट मागणी आहे की, प्रणितीला सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी द्यायाला पाहिजे. मी तशी हायकमांडकडे मागणीही करणार आहे, असंही ते म्हणाले. (Sushil Kumar Shinde demanded that Praniti Shinde should be nominated from Solapur Lok Sabha constituency)

चिठ्ठीत ‘आदित्य’, CM शिंदेंनी केलं ‘कान्हा’; बछड्यांच्या नावातही राजकारणाचा खेळ

काही दिवसांपासून प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडूनही याबाबतची मागणी होताना दिसत आहे. नुकतीच सोलापूरच्या काँग्रेस भवनात प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यात सर्वानुमते आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातील उमेदवारी प्रणिती शिंदे यांना देण्यात यावी अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला आहे.

सोलापूर मतदारसंघ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. प्रणिती शिंदे यांचे वडील असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी तीनवेळा या मतदारसंघातून खासदारकी भूषविली आहे. मात्र 2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडे गेला आहे. 2014 साली भाजपच्या शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला. त्यानंतर 2019 मध्येही त्यांचा दीड लाखांच्या फरकाने पराभव झाला.

हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

प्रणिती शिंदेंची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री :

दरम्यान, प्रणिती शिंदे यांची काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली आहे. अत्यंत कमी वयात त्यांना काँग्रेसच्या प्रतिष्ठीत अशा कार्यकारी समिती अर्था वर्किंग कमिटीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. वर्किंग कमिटीतील स्थान आणि जोडीला सुरु असलेली लोकसभेची चर्चा या पार्श्वभूमीवर त्या दिल्लीत जाणार का? याचे उत्तर काही दिवसांतच मिळेल.

Exit mobile version