सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांचे मुंबई (Mumbai)आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी जोरदार टीका केलीय. त्या म्हणाल्या की, मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट (2BHK Flat)घ्यावा आणि इथंच राहावं, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय. सातारा जिल्ह्यात पाटण मल्हार पेठ येथील महाप्रबोधन यात्रा सभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, मोदी-शाहांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे. त्यांना माहिती आहे की, येणाऱ्या काळात मुंबईत त्यांना आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच देऊ शकतात, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
Shrikant Shinde यांच्या कल्याणच्या जागेवर भाजपचा डोळा
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, अशी अपेक्षा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली होती. त्यावरही सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय, त्या म्हणाल्या की, हे सगळं बोलणं त्यांची मजबुरी आहे. 14 तारखेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात संधी मिळावी यासाठी संजय शिरसाठ असं विधान करत आहेत.
मला माझ्या नेतृत्वाची एक गोष्ट फार आवडते. ते फार सच्चेपणाने वागतात. उद्धव ठाकरे रोखठोक आहेत. आमच्या पोटात जे असते तेच ओठावर असते. संजू भाऊंनी उगाच रक्त आटवू नये, असा टोलाही यावेळी अंधारे यांनी लगावला.