Download App

Solapur News : लग्नाळूंची ‘अशी’ झाली फसवणूक; महिलेसह अनेकजण ताब्यात

सोलापूर : लग्नाळू तरुणांना लग्नाचं आमिष (Lure of marriage for married youth)दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी (Registration Fee)घेऊन फसवणूक केली जात असल्याचा प्रकार बार्शीत (Barshi)उघडकीस आलाय. याप्रकरणी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलेसह एजंटला बार्शी पोलिसांनी (Barshi Police)ताब्यात घेतलंय.

या प्रकारानं बार्शी शहरात खळबळ उडालीय. बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचं (Parents of bride and groom should meet)आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारो महिला, पुरुष, पालक आणि लग्नाळू तरुणांना वेगवेगळ्या वाहनांनी या ठिकाणी आणलं होतं.

या सर्व पालक आणि तरुणांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल. मुलगी पसंत पडल्यास लगेच लग्न लावून दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यातील कित्येक पालकांचा हा तिसरा मेळावा होता. पण प्रत्यक्षात त्यांना नवरी मुलगी काही पाहायला मिळालीच नव्हती. मार्चपर्यंत आपल्याला मुलगी नक्की मिळेल, असं सांगितलं जात होतं. मेळाव्यात सर्वांसमोर मुलांची नावं पुकारुन बोलवलं जात होतं. बऱ्याच पालकांना आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी नागरिकांना फोन करुन सांगितलंय. जागरुक नागरिकांनी या ठिकाणी लोकांच्या भावनेशी खेळून खोटी आश्वासनं दाखवली जात असून नागरिकांची फसवणूक होत असल्याचं पोलिसांना कळवलं.

एका कथित महिला वधू-वर सुचक मंडळानं आयोजित वधू-वर मेळाव्यासाठी बार्शीसह भूम, परंडा, वाशी, करमाळा, कळंब आदी तालुक्यांतील शेकडो लग्नाळू आले होते. या युवक आणि पालकांकडून पैसे घेऊन फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या पालकांच्या आणि मुलांच्या व्हॉट्सअॅपवर काही बायोडेटा, मुलींचे फोटोदेखील पाठवले होते, पण 24 तासांत ते फोटो डिलीट केले जात होते. यासोबतच कित्येक पालकांना तुम्ही लग्नाच्या तयारीनिशी या, तुम्हाला मुलगी पसंत पडल्यास लगेच लग्न लावून देऊ किंवा आमच्या बीड येथील अनाथ आश्रमात काही मुली आहेत, त्यादेखील आपल्याला दाखवू आणि आपले लग्न लावून देऊ, असं आमिषही दाखवलं होतं.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ नोंदणीकृत नाही, या मंडळानं आजपर्यंत एकही लग्न लावलेलं नाही. निव्वळ आश्वासनं दिल्याचं यावेळी पोलिसांच्या वधू-वर-मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरुन दिसून आलं. त्यामुळं पोलिसांनी तात्काळ त्या महिलेसह दहा-बारा एजेंटना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.

फसवणूक झालेल्या पालकांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लग्नाळू तरुण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचंही समोर आलंय.

Tags

follow us