निकालाआधीच तांबे समर्थकांचा जल्लोष

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. मतांची आघाडी पाहता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच सत्यजित तांबे यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे गाजली. महाविकास आघाडीला शुभांगी पाटील […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. मतांची आघाडी पाहता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच सत्यजित तांबे यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे गाजली. महाविकास आघाडीला शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यावा लागला. अशा स्थितीत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे समर्थक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थकांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंकेंनी तांबेंना समर्थन देत पदाचा राजीनामा दिला. मतदानाच्या आधी विखे गट व भाजप कार्यकर्त्यांनी तांबे यांच्या मागे बळ उभे केले. त्यामुळे तांबे यांची मतांची आघाडी वाढली.

वाढता पाठिंबा पाहता तांबे समर्थकांनी आज सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजयाचे पोस्टर लावले. तसेच जल्लोषाची तयारी केली.

शेवटच्या तीन फेऱ्या बाकी असताना तांबे समर्थकांनी संगमनेर, अहमदनगर, श्रीगोंदे आदी ठिकाणी रस्त्यावर येत जल्लोष केला. अहमदनगरमधील लालटाकी परिसरात माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी समर्थकांसह जल्लोष केला.

Exit mobile version