कोल्हापूर : राधानगरीतील (Radhanagari) एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील एका शिक्षकानेच विद्यार्थींना (Child abuse) पॉर्न व्हिडिओ (Porn videos) दाखवल्याचे समोर आले आहे. यानंतर पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
राधानगरीतील वर्ग शिक्षकाच्या या कृत्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता आरोपीची तातडीनं बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही.पी बांगडी असं आरोपी शिक्षकाचं नाव असून तो राधानगरीतील एका शाळेत इंग्रजी विषय शिकवत होता. त्यानंतर आता राधानगरीत संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातल्या एका शाळेत इंग्रजीचा तास सुरू असताना आरोपी शिक्षक व्ही.पी बांगडी यानं नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनींना पॉर्न व्हिडिओ दाखवला. त्यानंतर मुलींना वर्गात घडलेला हा सारा प्रकार आपल्या पालकांसहित मुख्याध्यापकांना सांगितला.
त्यानंतर आरोपी शिक्षकाची बदली करण्यात आली असून पालकांनी शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंग्रजीचा तास सुरू असताना आरोपी शिक्षकानं मुलींना पॉर्न व्हिडिओ दाखवून विद्यार्थीनींवर वाईट नजर टाकल्याचाही आरोप वर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे.
आरोपी शिक्षकानं असं धक्कादायक कृत्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीदेखील त्यानं अशाच प्रकारे विद्यार्थीनींना छेडल्याचा प्रकार समोर आला होता.
राधानगरीतील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक व्ही.पी बांगडी याची तातडीनं बदली करण्यात आली असून त्याच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळं आता संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला निलंबित करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.