Download App

नगरकरांनो लक्ष द्या ! पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात झाला बदल…

अहमदनगर : नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. अहमदनगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजने वरील नवीन मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (ता. 18) शटडाउन घेण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. याबातची माहिती खुद्द महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची मुळानगर ते विळद पंपिंग स्टेशन दरम्यान कार्यरत नवीन जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यासाठी अहमदनगर महापालिकेने शनिवारी (ता. १८) शहर पाणी पुरवठा योजनेवर शट डाउन घेण्यात येणार आहे. या जलवाहिनीव्दारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद करून दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत.

राज्यावर पुन्हा घोंगावतेय कोरोनाचे संकट; केंद्राने उचलले महत्वपूर्ण पाऊल

कोणत्या परिसरात कधी पाणी येणार? जाणून घ्या
शनिवारी (ता. १८) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर बुरूडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्ता परिसर आदी भागाला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्या ऐवजी पाणी पुरवठा हा रविवारी (ता. १९) येईल. रविवारी (ता. १९) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला सोमवारी (ता. २०), सोमवारी पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला मंगळवारी (ता. २१) पाणी पुरवठा करण्यात येईल.

काळजी घ्या…नव्या व्हायरसवर उपचार नाही; खबरदारी हाच उत्तम पर्याय!

शहरातील पाणी पुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आहे, अशा भागात पाणी पुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. तरी नगरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Tags

follow us