साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात

सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे […]

A Revolver Held By Two Anonymous Hands Is Fired On A Black Background.

A Revolver Held By Two Anonymous Hands Is Fired On A Black Background.

सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे नाव आहेत तर मदन कदम असे आरोपीचं नाव आहे. आरोपी मदन कदमचे गावात फार्म हाऊस आहे. या खुणांचा त्या फार्म हाऊसशी काही संबंध आहे का? या अंगाने पोलीस तपास करत आहेत.

राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमीनदोस्त, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत 

घटनेची माहिती मिळताच पाटणचे पोलीस घटनास्थळी पोहचले. आणि एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमके हे खून कशासाठी केले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळी पोहचले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Exit mobile version