Download App

Video : तिथे काहीतरी गंभीर…; साताऱ्यातील दोन्ही राजांचा वाद फडणवीसांच्या कोर्टात

  • Written By: Last Updated:

Devendra Fadanvis On Udayanraje & Shivendraraje Controversy : पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह काल (दि. 21) समोरासमोर आले होते. त्यानंतर आज हा वाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला. आज फडणवीसांनी दोन्ही राजांची भेट घेतली. यावेळी दोन्ही राजांसोबत नेमकी काय चर्चा झाली याबाबत फडणवीसांनी माहिती दिली आहे.

दोन्ही राजांच्या भेटीदरम्यान साताऱ्यातील विकासकामांबद्दल चर्चा झाल्या. येथील काही सिंचनाचे तसेच विकासाचे प्रश्न असून, या सर्वांबाबत चर्चा झाली काही निवेदनेदेखील त्यांनी दिल्याचे फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितले. दोघांनाही जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. दोन्ही राजांमधील वाद फारसा गंभीर नाहीये. अशा गोष्टी कधीकधी होत असतात. परंतु तिथे काहीतरी गंभीर घडतंय असं काही नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले असून, तिथे काही अडचणीची स्थिती नसल्याचे फडणवीस म्हणाले. उदयनराजे समर्थकांनी भूमीपूजनाचा कार्यक्रमच उधळून लावला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांनी जागेवर दावा केल्याने या वादाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आज फडणवीसांनी दोन्ही राजांची भेट घेतली.

राष्ट्रवादीला ठोकला रामराम; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा बीआरएसमध्ये प्रवेश

वाद नेमका कसा सुरू झाला

सातारा येथे काल (दि. 21) एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आमनेसामने आले होते. सातारा येथील शाहू फळे, फुले भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरुन ही दोन्ही नेतेमंडळी आपापसात भिडली. या जागेवर शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. मात्र, उदयनराजे यांनी अगोदर घटनास्थळावर येत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी मार्केट कमिटी चोर है अशी घोषणा उदयनराजेंच्या समर्थकांनी दिली. तर एक नेता एक आवाज शिवेंद्रबाबा अशी घोषणा शिवेंद्रराजेंचे समर्थक देत होते. यावेळी घटनास्थळावर पोलिसदेखील उपस्थित होते. एकीकडे एवढा गोंधळ सुरु असताना शिवेंद्रराजेंनी भूमिपूजनसाठी कुदळ मारली. यानंतर तर उदयनराजेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले.

Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित

हा कोर्टाचा अवमान असल्याचे उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी म्हटले. यावेळी जागेचे मालक आणि कुळांनी जागेवर बैठक मांडून आमच्यावर अन्याय नको अशी मागणी केली. तसेची ही जागा वहिवाट दार यांची असून त्याची कोणतीही परवानगी आमदार गटाने घेतलेली नाही. त्यामुळे हे भूमीपूजन बेकायदेशीर आहे, असे उदयनराजेंच्या गटाने म्हटले. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जागेचा सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर झाला आहे. खासदारगटाकडे कायदेशी कागदपत्रे असतील तर दाखवावी अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी दोन्ही गटातील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र नऊ वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले, आणि तिथं असलेलं साहित्य फेकून दिलं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीनं नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमिपूजन केलं.

Tags

follow us