Vishalgad Encroachment movement violent Crimes filed by Police : विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgad Encroachment) हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान परिसरातील वाहनांची आणि घरांची तोडफोड करण्यात आल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेनंतर पोलिसांकडून आता या प्रकरणी गुन्हे दाखल (Crimes filed) करायला सुरुवात झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
विशाळगडावर सुमारे 158 अतिक्रमण आहेत यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे हे न्यायालयीन वाद सुरू असलेले अतिक्रमण सोडून अन्य अतिक्रमण काढण्यात यावीत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांकडून विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात येत होती. याच मागणीसाठी रविवारी 14 जुलैला काही शिवभक्त थेट हे अतिक्रमण हटवण्यासाठी विशालगडावर पोहोचले. मात्र यावेळी हे आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
विधान परिषद निवडठणुकीत ‘मविआ’मध्ये एकमत नव्हतं; पवारांच्या फोनला ठाकरेंचा ‘नो रिस्पॉन्स’
संतप्त जमावाने गडाच्या शेजारीच असलेल्या गजापूर या ठिकाणी काही घर दारासमोर लावलेल्या गाड्या त्यांच्यावर दगडफेक केली गाड्या उलथून टाकल्या तसेच घराला लावलेल्या आहेत. एका सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र ही आग वेळीच नियंत्रणात आणल्याने अनर्थ टाळला. तसेच यामध्ये तलवारी, कोळते, कुदळ या शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.
Mujya OTT : मुन्नीच्या शोधात ‘मुंज्या’ तुमच्या घरी येणार; थिएटरनंतर आता ओटीटीवर होणार रिलीज
तर या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये गेल्या आठवड्यात संभाजी राजे छत्रपती यांच्यासह हिंदुत्व आणि संघटनांनी अतिक्रमण हटवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे घटनेनंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणारे पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवाय या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून सीसीटीव्ही तसेच रेकॉर्डिंग तपासून आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेची तात्काळ दखल घेत रात्री एक वाजता कोल्हापुरात हजेरी लावली. मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली तसेच कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांना बंदोबस्त वाढवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सूचना दिल्या.