‘गणेश’च्या विजयानंतर विवेक कोल्हे थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला…

गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीमुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगलीय. अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार? दरम्यान, […]

Vivek Kolhe News

Vivek Kolhe meet devendra fadnvis

गणेश सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता विवेक कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हे यांचं अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या भेटीमुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगलीय.

अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार?

दरम्यान, विवेक कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. कोपरगाव मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आहेत. कारखाना निवडणुकीच्या यशानंतर विवेक कोल्हे राज्यातील राजकारणाच्या प्रकाशझोतात आले आहेत.

अजितदादा बोलले पण, भुजबळांनीच प्रदेशाध्यक्षपदावर ठोकला दावा; सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

त्यानंतर लगेचच ते फडणवीसांच्या भेटील गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आगामी निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघात काय चित्र असेल? विवेक कोल्हे हे भाजपकडून उमेदवारीसाठी दावा ठोकतील का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Photo : एकेकाळी सलमान खानच्या भावाच्या प्रेमात होती, ‘बिग बॉस OTT 2’ ची ही स्पर्धक

गणेश सहकारी साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून महसूल मंमत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता होती. या निवडणुकीत विखे गटाला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

थोरात आणि एकत्र येत गणेश कारखाना निवडणुकीत परिवर्तन पॅनलकडून उमेदवार उभे केले होते. अखेर सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये परिवर्तन पॅनलला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. थोरात आणि कोल्हेंच्या परिवर्तन पॅनलने 19 पैकी 18 जागांवर आपला दिमाखदार विजय संपादन करीत विखे गटाला धूळ चारली आहे.

या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने गणेश साखर कारखान्याची निवडणूक चर्चेचा विषय ठरली. विखे पाटील यांच्या विरोधात भाजपचेच कोल्हे मैदानात उतरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Exit mobile version